Heinrich Klaasen Retires From Test Cricket – दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज हेनरीच क्लासेन याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून सोमवारी निवृत्ती जाहीर केली आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यात त्याला जीतके यश मिळाले तेवढे यश त्याला कसोटी क्रिकेटमध्ये मिळालेल नाही. तसेच गेल्या काही महिन्यांपासून तो कसोटी संघात स्थान मिळवण्यातही अपयशी ठरत होता, अखेर त्याने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला.
2019 मध्ये रांची येथे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या 32 वर्षीय क्लासेनने आपल्या छोट्या कसोटी कारकिर्दीत चार सामने खेळले. त्याने शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध जोहान्सबर्ग येथे खेळला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 4 कसोटी सामने खेळताना 104 धावाच केल्या आहेत. 35 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
मात्र, मर्यादीत षटकांच्या सामन्यात त्याने अफाट यश मिळवले आहे. त्यामुळे कसोटीला अलविदा केले असले तरीही तो एकदिवसीय तसेच टी-20 सामने खेळतच राहणार आहे. क्लासेनचा आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघात समावेश आहे.
कर्णधार डीन एल्गरनंतर काही दिवसांतच कसोटीतून निवृत्ती जाहीर केलेला क्सालेन दक्षिण आफ्रिकेचा दुसरा मोठा फलंदाज ठरला आहे. क्लासेनने दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंत एकूण 54 एकदिवसीय आणि 43 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांत 1 हजार 723 तर टी-20 मध्ये 722 धावा केल्या. क्लासेनच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार शतके आणि सहा अर्धशतके आहेत आणि टी-20 मध्ये चार अर्धशतके आहेत.