INDIA vs ENGLAND Test Series 2024 : अफगाणिस्तानसोबतच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाचा सामना ब्रिटिशांशी (इंग्लंड) होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडनेही कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 25 ते 29 जानेवारी दरम्यान हैदराबादमध्ये खेळवली जाणार आहे. यानंतर दुसरी कसोटी 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे होणार आहे. तिसरा कसोटी सामना 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. चौथा कसोटी सामना 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान रांची येथे तर पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 7 ते 11 मार्च दरम्यान धरमशाला येथे खेळवला जाईल.
भारतातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघात जो रूट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन स्टोक्स, शोएब बशीर, बेन फॉक्स आणि ऑली पोप यांच्या रूपात नऊ फलंदाज आहेत. टॉम हार्टले, जॅक लीच आणि रेहान अहमद हे तीन फिरकीपटू आहेत. वेगवान गोलंदाजीमध्ये जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, ऑली रॉबिन्सन आणि मार्क वुड यांचा समावेश आहे.
IND vs ENG Test Series 2024 : रणजीतील द्विशतकी खेळीमुळे ‘चेतेश्वर पुजारा’च्या निवडीची शक्यता…
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ –
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक) ), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
#INDvAFG T20I Series | अखेर रोहित-कोहली टी-20 संघात परतले, ‘या’ देखील खेळाडूंना मिळाली संधी…
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक…
पहिली कसोटी : 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
दुसरी कसोटी : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वायएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरी कसोटी : 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
चौथी कसोटी : 23-27 फेब्रुवारी, रांची ( जेएससीए JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
पाचवी कसोटी : 7-11 मार्च, धरमशाला (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)