Oppenheimer Movie – ख्रिस्तोफर नोलान द्ग्दर्शित ओपनहॅमर या चरित्रपटाला हॉलिवूडमधील ख्यातनाम अशा गोल्डन ग्लोबच्या ५ पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचाही समावेश आहे. तर योर्गास लाथिमोस यांच्या फ्रॅन्केन्स्टिन रिफ पूअर थिंग्सने बार्बीला मागे टाकून सर्वोत्कृष्ठ विनोदी आणि संगीत श्रेणीचा पुरस्कार पटकावला.
मात्र यावेळच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांवर ओपनहॅमरची छाप होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार नोलान यांना, सर्वोत्कृष्ठ कलाकार म्हणून सिलियन मर्फी यांना, सर्वोत्कृष्ठ सहकलाकार रॉबर्ट डौनी ज्युनिअर आणि सर्वोत्कृष्ठ गायिका म्हणून लुडविक गोरानसोन यांना गौरवण्यात आले.
View this post on Instagram
सर्वोत्कृष्ट कॉमेडी किंवा संगीताबरोबरच, पुअर थिंग्जने एम्मा स्टोनच्या बेलाच्या भूमिकेसाठी देखील पुरस्कार जिंकला. एक अतिवास्तव जीवन आणि लैंगिक जीवनाचा अर्थ समजलेल्या एका व्हिक्टोरियन स्त्रीची ही व्यक्तिरेखा आहे. लिली ग्लॅडस्टोनला मार्टिन स्कॉर्सेसच्या किलर्स ऑफ द फ्लॉवर मूनसाठी नाट्यमय चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
गोल्डनग्लो पुरस्कारांचे हे ८१ वे वर्ष होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या पुरस्कार सोहळ्यासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली होती. हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन विसर्जित झाल्यामुळे ऑस्कर आणि ग्रॅमीनंतरचा सर्वात दिमाखदार सोहळ्याचा मान टिकवण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारांना प्रचंड यातायात करावी लागली होती.