खासदार बापट, सोमय्या यांनी घेतला आढावा : कार्यकर्त्यांना सूचना
पुणे – संगणकाच्या स्मार्ट युगातही पदयात्रा काढत समाजाच्या प्रत्येक स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवाजीनगर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे पारंपरिक प्रचारावर भर देत आहेत. गेल्या आठ दिवसांत शिवाजीनगर मतदार संघातील विविध ठिकाणी पदयात्रा, प्रचारफेऱ्या, मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांचा प्रचार सुरू आहे. याबरोबरच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनीही सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यालयात नुकतीच सदिच्छा भेट देत प्रचारयंत्रणेचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.
शुक्रवारी भांडारकर रस्ता परिसरातील दत्त मंदिर, कमला नेहरू पार्क, हिरवाई वॉकिंग ट्रॅक बरोबरच डेक्कन जिमखाना हौसिंग सोसायटीमध्ये शिरोळे यांनी भेट दिली. या वेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, जोत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नाना मोरे, गणेश बगाडे, जीतू मंडोरा, दत्ता खंडागळे, प्रवीण शेळके, बाबा शिरोळे, निलेश घोडके, मिलिंद टकले आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर येरवडा येथील जय जवान नगर या ठिकाणी देखील प्रचारफेरी पार पडली.
या वेळी नगरसेविका श्वेता चव्हाण, शंकर चव्हाण, केतन पवार, अंकुश राठोड, विक्रम राठोड, दीपक चव्हाण, राहुल राठोर, करण पवार, किरण चव्हाण, मोहित काकडे, निखील रणनवरे उपस्थित होते. गुरूवारी औंध आयटी पार्क जवळील शांतिनिकेतन या सोसायटीत शिरोळे यांनी भेट दिली. सदस्यांबरोबर विविध बाबींवर या वेळी सविस्तर चर्चा करून नागरिकांच्या अपेक्षाही त्यांनी समजून घेतल्या. यावेळी नगरसेविका सुनीता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेवक विजय शेवाळे आणि माजी नगरसेवक आनंद छाजेड उपस्थित होते.