“सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”; भाजपची शिवसेनेवर टीका

मुंबई  : अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र करण्यात आलेले सर्व आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत फेटाळले आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या टीकेला उत्तर सडेतोड दिले आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. “सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे. ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!,” असा इशाराच त्यांनी दिला आहे.

अतुल भातखळकर यांनी एकामागोमाग अनेक ट्विट केले आहेत. “लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो.


हे ही वाचा –
▶ 
‘…तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल’
▶ अयोध्येतील जमिनीचा घोटाळा उघडकीस; प्रियांका गांधींची राम मंदिर चळवळीतील नेत्यांवर जोरदार टीका
▶ राम जन्मभूमी कथित गैरव्यवहार प्रकरणाची उत्तर मिळावीत : संजय राऊत
▶ राममंदिर जमीन खरेदी भ्रष्टाचार प्रकरण! “आता मोहन भागवतांनी खुलासा करावा,”; संजय राऊतांचा संताप

शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही,” असेही म्हटले आहे.

तसेच “शिवसेनेने आता ‘हजरत टिपू’चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे,” असंही सांगितलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.