एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट; ‘या’ अभिनेत्यास अटक

मुंबई – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेता मयुरेश कोटकर याला रविवारी अटक करण्यात आली. ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या वाद सुरू असताना अभिनेत्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली. त्याप्रकरणी अभिनेता मयुरेशयास पोलिसांनी अकट केली आहे. त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

हा प्रकार शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लगेचच श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी फेसबुकवरून हा आक्षेपार्ह मजकूर डिलीट केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.