शिरूर -तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढतच आहे. गुरुवार (दि. 21) पर्यंत तालुक्यात 16 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात सातजण करोनावर मात करीत घरी परतले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जणांवर उपचार सुरू आहेत. यात शिरूर तालुक्यातील 9 जण असून बाहेरून आलेल्या 6 जणांचा समावेश असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यात सात गावांत हे रुग्ण आढळून आले. या सातही गावात शासन लक्ष ठेवून आहे. येथील प्रत्येक हालचालीवर सर्व खात्याचे अधिकारी डोळे लावून आहेत. शिरूर तालुका चौथ्या लॉक डाऊनमध्ये ऑरेंज झोनमध्ये असून रुग्ण संख्या वाढत गेली तर रेड झोनमध्ये येण्यास वेळ लागणार नाहीे. अनेक रुग्णांच्या संपर्कात आलेले अनेक डॉक्टर, नर्सेस, नागरिक यांचा अहवालही निगेटिव्ह आल्याने तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.