Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil : लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यात शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाचे नेते आढळाराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
त्यामुळे आता शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लोकसभा लढवणार आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या अमोल कोल्हे खासदार आहेत.
मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेले. त्यानंतर आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या.
त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असा चंग अजित पवारांनी बांधलाय. त्यानंतर आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला.
त्यामुळे आता शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी थेट लढत होणार आहे. त्यानुसार या दोन्ही नेत्यांनी कामाला सुरुवात केली आहे.
आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले. त्यावरून डॉ. कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री आलेच नाहीत, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी काय सभा घेणार नाही. मी फक्त रोड शो करून जाईल. यावरूनच स्पष्ट होत आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत.
जनतेच्या हिताचे आणि रोजच्या जगण्याच्या संदर्भातील प्रश्न मी उपस्थित करतो आहे, माझ्या प्रचारातही हेच मुद्दे असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
आढळरावांनी उमेदवारी अर्ज भरला । Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil
शिरूर लोकसभेसाठी महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अर्ज भरला. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
त्यांचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके उपस्थित होते.