जालना – जालन्यात आज सकाळी 26 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या 26 पैकी तब्बल 25 रुग्ण हे जालना शहरातील असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.
जिल्हा रुग्णालयाने प्रयोग शाळेकडे पाठविलेल्या नमुन्यांचे अहवाल आज सकाळी प्राप्त झाले आहेत. त्यात जालना शहरातील खडकपुरा येथील 6, आनंद नगर 3, लक्कडकोट 4, समर्थनगर 2, रामनगर 5 (जालना शहर ), कन्हैय्यानगर, आरपी रोड, क्रांतीनगर, सरकारी रुग्णालयातील दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या डॉक्टरचा 1 नातेवाईक मंगलबाजार, जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील प्रत्येकी एक असे एकूण 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, यामध्ये जालना शहरातील एक सत्ताधारी नगरसेवकांच्या जवळच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.