मुंबई – सुशांतसिंह राजपूतने नैराश्यातून आत्महत्या केली. त्याचा सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी स्वतःच्या निराश अवस्थेतील अनुभव सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. काहींनी बॉलीवूडमध्ये कसे चुकीच्या पद्धतीने हाताळले जाते, याचे आरोपसत्र सुरू केले.
यातच,अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू आहे.पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांचा जबाब नोंदविला आहे.
यातच त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांना जबाब दिला आहे. रियाने पोलिसांना सांगितले की,”मला सुशांतने यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले होते, सुशांत म्हणाला मी ही यशराज सोडत आहे.’ सुशांत हे का बोलला, त्याला स्वत: यशराजला का सोडायचे होते? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी यशराज फिल्म्स आणि सुशांत यांच्यातील कराराची कागदपत्रे पोलिसांनी मागितली आहेत. त्याचवेळी पोलिस यशराजचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांना चौकशीसाठी बोलवण्याची तयारी करत आहेत.’
दरम्यान, सुशांत आणि त्याच्या नात्याबद्दल सांगितले , सुशांत यशराज फिल्म्सच्या ‘शुद्ध देसी रोमांस’ चित्रपट करत होता आणि मी यशराज फिल्म्सच्या ‘मेरे पिताजी की मारुती’ च्या चित्रीकरणात होते. तेव्हा आम्ही प्रथमच भेटलो, त्यानंतर आम्ही इंडस्ट्रीच्या पार्टी आणि इवेंट्समध्ये भेटू लागले. नंतर आमची मैत्री झाली. वर्ष 2019 मध्ये सुशांतने मला प्रपोज केले. सुशांत मला म्हणाला, ‘मी तुला अप्रत्यक्षपणे सांगू शकत नाही, म्हणूनच मी तुला थेट सांगत आहे. मला तू आवडते.’ रियाही सुशांतला पसंत करायची, दोघांमध्ये प्रेम झालं आणि एक नातं सुरू झाले.