मुलगी आणि आई यांच्या नाजूक संबंधावर आधारित असलेली निर्माता आरती दास यांचा चित्रपट सीजन्स ग्रीटिंग्सची स्ट्रिमिंग जी-5 वर सुरू झाली आहे. या चिपिटात आई आणि मुलीचा भूमिका अनुक्रमे लिलेट दुबे आणि सेलिना जेटली साकारत आहेत. पूर्वी पत्रकार आणि आता निर्माते झालेले रामकमल मुखर्जी यांचा हा पहिलाच दिग्दर्शित चित्रपट आहे.
या चित्रपटातून बोल्ड अभिनेत्री सेलिना जेटलीचे पुनरागमन होत आहे. तिचा शेवटचा प्रदर्शित चित्रपट विल यू मॅरी मी हा होता. तिने 2011 मध्ये परदेशी कलाकार पीटर हॉगशी विवाह केला. मात्र ती सोशल मीडियावर सक्रिय असते. यापूर्वी मुलीची भूमिका पाओली डॅम साकारणार होती. परंतु तिच्या जागी सेलिना जेटलीला घेतले. या चित्रपटात अजहर खानने सेलिनाचा मित्र आणि तृतियपंथीय असणाऱ्या श्रीघटकने घरातील कामवाली चपलाची भूमिका केली आहे.
या चित्रपटाचे संपूर्ण चित्रिकरण कोलकता येथे झाले आहे. हा चित्रपट देश-परदेशातील सोहळ्यात देखील प्रदर्शित झाला आहे. त्या ठिकाणी या चित्रपटाचे बरेच कौतुक झाले. यादरम्यान हा चित्रपट कोलकता आणि मुंबईत जोरदारपणे रिलिज करण्याचा विचार होता. परंतु करोनामुळे लॉकडाउन सुरू असल्याने ओटीटी जी-5 चा पर्याय समोर आला.