दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सोशल मीडियावर कोट्यावधी लोक तिला फॉलो करतात. अभिनेत्री समंथा लवकरच मनोज बाजपेयी अभिनीत द फॅमिली मॅन या सीरीजच्या दुसऱ्या भागातून हिंदी मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या या आगामी वेब सीरीजमुळे ती प्रसिद्धी झोतातही आली होती.
नुकताच समंथाच्या या सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला असून, सगळीकडे तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. ही वेब सीरीज 4 जून रोजी ऍमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने बॉलिवूडच्या एका हिरोला आपला आवडता अभिनेता म्हणून वर्णन केले आहे.
द फॅमिली मॅन 2 या वेब सीरीजमध्ये या अभिनेत्रीने तमिळ लिबरेशन फ्रंट एलटीटीई सदस्याची भूमिका साकारली आहे. अशा परिस्थितीत सध्या समंथा आपल्या वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार नुकत्याच झालेल्या प्रमोशन दरम्यान तिने खुलासा केला आहे की, बॉलिवूड चित्रपटांकडून आपल्याला अनेक ऑफर आल्या आहेत, परंतु भाषेच्या मुद्द्यांमुळे तिने या चित्रपटांना नकार दिला आहे.
इतकेच नव्हे तर अभिनेत्रीने उघडपणे सांगितले आहे की, जर तिला बॉलिवूडचा चित्रपट मिळाला तर तिला पडद्यावर कोणत्या बॉलिवूड कलाकारासोबत रोमान्स करायला आवडेल?, असा प्रश्न विचारण्यात आला. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार अभिनेत्रीने या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता रणबीर कपूरचे नाव घेतले आहे. म्हणजेच समांथाला रणबीर कपूरला रोमान्स करायचा आहे .