Bollywood News । बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रेग्नेंट असून तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ एन्जॉय करत आहे. सप्टेंबर महिन्यात ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. जसजसे महिने उलटत आहेत तसतसे दीपिका ग्लॅमरच्या जगापासून दुरावत आहे. या वर्षी दीपिकाने जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट ‘मेट गाला’ देखील वगळले.
सध्या ती तिचे बेबीमून एन्जॉय करत आहे. हे जोडपे अज्ञात ठिकाणी सुट्टी साजरी एन्जॉय करत आहे. यादरम्यानचा दीपिकाचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा बेबी बंप पहिल्यांदाच स्पष्ट दिसत आहे.
फोटोत दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग जहाजाच्या पायऱ्या उतरत आहेत. दीपिका पुढे आहे. तिने आरामदायक आणि सैल कपडे घातले आहेत. तरीही तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. दीपिकाच्या मागे रणवीर सिंगही दिसत आहे.
गरोदरपणामुळे दीपिका यावर्षी मेट गालाचा भाग होऊ शकली नाही. तिने 2017 मध्ये या फॅशन इव्हेंटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती 2018 आणि 2019 मध्येही दिसली होती. दीपिकाप्रमाणेच प्रियांका चोप्रादेखील यंदा या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. मात्र, आलिया भट्टने साडी नेसून भारतीय संस्कृतीचा झेंडा फडकवला आहे.
दीपिकाच्या वर्क फ्रंट बाबत सांगायचे झाल्यास ती सध्या ‘सिंघम अगेन’चे शूटिंग करत आहे. सेटवरील तिचे काही फोटोही व्हायरल झाले होते. या चित्रपटात रणवीर सिंग देखील आहे. याशिवाय दीपिका प्रभाससोबत ‘कल्की 2898 एडी’मध्येही दिसणार आहे, जो 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.