राहुरीतील निकम टोळीतील पाच जणांना मोक्‍का

 नगर -नगर जिल्ह्यात संघटित गुन्हे करणाऱ्या राहुरीतील कात्रड येथील कुख्यात गुन्हेगार सुरेश रणजित निकम याच्यासह त्याच्या टोळीतील पाच जणांवर मोक्काची कारवाई झाली आहे. या टोळीविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी संघटित गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरू केली आहे. तडीपार, मोक्कानुसार कारवाई केली जातच आहे. त्यानुसार नगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश निकम व त्याच्या टोळीतील सदस्यांविरोधात मोक्का कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून तो विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक येथे पाठविला होता.

या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार टोळीप्रमुख सुरेश निकम (वय 28, रा. कात्रड, राहुरी), करण नवनाथ शेलार (वय 19 रा. मोरे चिंचोरे, ता. नेवासा), विकास बाळू हनवंत (वय 24), सागर शिवाजी जाधव (वय 30), सतिष अरुण बर्डे (वय 28, तिघे राहणार कात्रड) असे आरोपींचे नावे आहे. या टोळीविरोधात नगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचे सहा गुन्हे आहेत. तर सोनई पोलीस ठाण्यात दोन दरोड्याचे गुन्हे आहेत.

महामार्गावर वाहने अडवून जबरी चोरी करणे, दरोड्याची तयारी करणे, अशा स्वरूपाचे गुन्हे कट करून व संगणमताने स्वतःच्या टोळीचे आर्थिक फायद्याकरिता दहशत निर्माण करून केलेले आहेत. त्यामुळे टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 च्या कलमानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी प्रस्ताव मंजुरी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास नगर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी हे करित आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.