राहुरी विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

राहुरी  -महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी गुरुवारी राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित होते.

डॉ. पाटील यांनी आण्णांना गेल्या सहा महिन्यातील राबविण्यात आलेल्या विद्यापीठातील विविध उपक्रमांबद्दल माहिती देवून चर्चा केली. कुलगुरु डॉ. पाटील यांच्या कृषि पारायण या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आण्णांनी त्यांचे कौतुक केले व अशा प्रकारच्या उपक्रमातून शेती क्षेत्राला उर्जित अवस्था प्राप्त होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी राळेगणसिध्दी येथे उपस्थित असलेल्या पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण चमू बरोबर कुलगुरु डॉ. पाटील यांनी वार्तालाप करुन विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या सिंचन व्यवस्थापन व पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाबद्दल तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी सविस्तर चर्चा करुन यासंबंधीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. या भेटीप्रसंगी कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.