राहुल गांधींचा राजीनामा ? काँग्रेसची बैठक सुरु

File pic

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. गेल्या पाच वर्षांत कॉंग्रेसच्या खासदारांची संख्या केवळ आठने वाढून 52 वर पोहोचली आहे. परंतु ही संख्या वाढण्यापूर्वी कॉंग्रेसने बडे चेहरे गमावले आहेत. या  पराभवामागील कारणांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होत आहे. यावेळी पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा कार्यकारिणीसमोर सादर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पराभवाची जबाबदारी स्वीकारून काही राज्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. कॉंग्रेसने गमावलेला संसदेतला पहिला चेहरा म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे. कर्नाटकमधील गुलबर्गा मतदारसंघातून मल्लिकार्जुन खर्गे पराभूत झाले आहेत. त्यापाठोपाठ ज्योतिरादित्य शिंदे, हरियाणातील दीपेंदर सिंह हुड्डा, आसामच्या सुष्मिता सिंह या नेत्यांना पराभवाचा तडाखा बसला आहे. अशातच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी भविष्यकाळात काय उपाय योजता येतील, यावरही चर्चा होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here