पुणे – पर्वतीतून भाजपचे मताधिक्‍य घटले

संग्रहित छायाचित्र....

पुणे – शहरातील पारंपारिक भाजपाचे जे विधानसभा मतदार संघ आहेत त्यात पर्वत विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. सध्या या मतदार संघातून भाजपच्या माधुरी मिसाळ आमदार असून त्यांची ही दुसरी टर्म आहे. याशिवाय या मतदार संघात भाजपाचे तब्बल 22 नगरसेवक आहेत. त्यामानाने लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना मिळालेले मताधिक्‍य हे कमीच आहे. या विधानसभा मतदार संघातून बापट यांना 66 हजार 332 मतांची आघाडी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये माधुरी मिसाळ यांना 70 हजाराचे मताधिक्क मिळाले होते. विधानसभेला मिळालेली आघाडी पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बापट यांना मिळाले मताधिक्क थोडे कमीच आहे. त्यामुळे हे मतधिक्क कुठे कमी झाले याचे आत्मपरिक्षण आता भाजपला करावे लागणार आहे.

या मतदार संघातून वंचित आघाडीला सुद्धा चांगली मते मिळाली आहेत. या मतदार संघातून सुमारे 10 हजार 634 मते वंचित आघाडीच्या उमेदवाराला मिळाल्यामुळे याचा फटका नक्की कोणाला बसला, हा सुद्धा विचार करावा लागणार आहे. या मतदार संघात व्यापारी वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. हा वर्ग जीएसटी, नोटाबंदीमुळे मोदींवर नाराज आहे. यामुळे सुद्धा काही प्रमाणात मते घटली असल्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे.

या मतदार संघातून गिरीश बापट यांना 1 लाख 19 हजार 899 मते पडली आहेत, तर कॉंग्रेसचे मोहन जोशी यांना 50 हजार 567 मते पडली आहेत. प्रत्यक्षात कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड याचे व्यापारी वर्गाशी असणारे संबंध तसेच त्यांचा असणारा जनसंपर्क पाहता जादा मते मिळायला हवी होती. त्याचबरोबर भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांची तळजाई झोपडपट्टी आणि परिसरात मोठी ताकद आहेत. ती मतदानात रुपांतर झालेली दिसत नाही. नाहीतर बापट यांना मिळालेले 66 हजारांचे मतधिक्‍य आणखी कमी झाले असते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here