राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात अव्वल

सर्वाधिक 16 हजार 183 दावे निकाली : मुंबई दुसरा, तर रायगडने तिसरा क्रमांक पटकाविला

पुणे – राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुण्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. शनिवारी (दि. 14) झालेल्या लोकअदालतमध्ये राज्यात 61 हजार 728 दावे निकाली काढण्यात आले असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्याने 16 हजार 183 दावे निकाली काढले आहेत. जिल्ह्यात 87 हजार 958 दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 13 हजार 371 दाखलपूर्व, तर, उर्वरित 2 हजार 804 प्रलंबित स्वरूपाचे दावे निकाली काढण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव चेतन भागवत यांनी दिली.

पुण्याखालोखाल मुंबईने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. मुंबईने 6 हजार 859 दावे निकाली काढले आहेत. तर रायगड जिल्ह्याने 6 हजार 721 दावे निकाली काढत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. शनिवारी शिवाजीनगर येथील सत्र न्यायालय, कौटुंबिक न्यायालयासह शहरातील विविध न्यायालय आणि तालुक्‍यातील न्यायालयात लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हे दावे निकाली काढण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.