पीएमआरडीए मेट्रो : भूसंपादन प्रक्रिया सुरू

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो कारशेडसाठी आवश्‍यक जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सध्या प्राधिकरणाने 4 हेक्‍टर जागा ताब्यात घेतली असून थेट शेतकऱ्यांशी चर्चा करून मोबदला देण्यात आला आहे. पीएमआरडीएने चार हेक्‍टर जागेसाठी 40 कोटी रुपयांचा मोबदला दिला आहे. कारशेडसाठी सुमारे 18 हेक्‍टर जागेची गरज आहे. त्यापैकी 4 हेक्‍टर जागा प्राधिकरणाने थेट 15 शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे. पीएमआरडीएने जमीन अधिग्रहणासाठी पथक नेमले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.