बंगळुरू – एका विद्यार्थ्याची दहशतवाद्याशी तुलना केल्याबद्दल कर्नाटकातील एका प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात संबंधित विद्यार्थी प्राध्यापकांशी संतापाने बोलताना दिसतो आहे. तुम्ही मला दहशतवाद्याचे नाव घेऊन बोलू शकत नाही. तुमच्या मुलाशीही तुम्ही असेच बोलणार का, असा सवाल हा विद्यार्थी विचारताना दिसतो आहे.
Golden River Of India : भारतातील ‘या’ नदीत वाहते सोनं; जाणून घ्या…काय आहे रहस्य ?
काय आहे प्रकरण?
प्राध्यापकांनी वर्गात संबंधित विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारले. त्याने त्याचे नाव सांगितल्यावर तू कसाबसारखा आहे असे शिक्षक पुटपुटले. त्यांच्या या टिप्पणीवर संबंधित विद्यार्थी चिडला. 26/11 ही गमतीची घटना नव्हती. आम्हाला आमच्या धर्मावरून रोज अशा प्रकारांचा सामना करावा लागू शकतो.
Golden River Of India : भारतातील ‘या’ नदीत वाहते सोनं; जाणून घ्या…काय आहे रहस्य ?
धर्माबाबत अशी टिप्पणी करू नका. तुम्ही प्राध्यापक आहात. वर्गात शिकवत असताना तुम्ही इतक्या जणांसमोर मला अशा नावाने बोलावू शकत नाहीत. त्यावर संबंधित प्राध्यापकाने त्याला सॉरी म्हटले. मात्र सॉरी म्हटल्यामुळे तुम्ही कसा विचार करतात हे बदलू शकत नाही असे विद्यार्थी म्हणाला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून प्राध्यापकला निलंबित करण्यात आले आहे.