#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. प्रत्येक होर्डिंग वर मी पस्तावतोय असा मोठ्या अक्षरात उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ही होर्डिंग्ज लावली असून यामध्ये यामध्ये कडकनाथ घोटाळा, महापूर, कांदा आयात, गडकोट किल्ले, एसआरए जमीन घोटाळा, आरे जंगल आदींचा उल्लेख करण्यात आला आहे. मध्यरात्री कोल्हापूर शहरातील विविध भागांत युवक काँग्रेसकडून ही होर्डिंग्ज लावण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. मुख्यमंत्री यांच्या यात्रेवर अनेक ठिकाणी अनेक संघटनानांकडून विरोध झाल्याचे पाहायला मिळतोय. काल सांगलीकडे यात्रा जाताना इस्लामपूर रोडवर ताफ्यातील मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर कडकनाथ प्रकरणात अडकलेल्या शेतकऱ्यांनी कोंबड्या आणि अंडी फेकून मारली. तर काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या होर्डिंगला अज्ञात व्यक्तीकडून काळे फसण्यात आले. आणि आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे होर्डिंग्ज लावण्यात आल्याने शहरात एकच चर्चेचा विषय बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.