T20 World Cup 2024 & IPL 2024 : आयपीएल 2024 दरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. आगामी T20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये मयंक यादवची निवड होऊ शकते, असे मानले जात आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तसेच, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्ससाठी एक दिलासादायक बातमी आहे. IPL 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मयंक यादवने उत्कृष्ट गोलंदाजीची झलक दाखविली होती, मात्र त्यानंतर दुखापतीमुळे त्याला बाहेर बसावे लागले होते.
मयंक यादव T20 विश्वचषक संघाचा भाग असेल का?
विशेषत: मयंक यादवने आपल्या वेगानं दिग्गजांना प्रभावित केलं आहे. या वेगवान गोलंदाजाच्या चेंडूंसमोर फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते, मात्र दुखापतीनंतर लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला. मात्र, आता चांगली बातमी येत आहे की, या वेगवान गोलंदाजाने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे मयंक यादव लवकरच लखनौ सुपर जायंट्सच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये चमकदार गोलंदाजी केल्यानंतर मयंक यादवने क्रिकेट चाहत्यांचे आणि दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर मयंक यादवचा टी-20 विश्वचषक संघात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मयंक यादवची आतापर्यंतची कामगिरी …
मात्र, मयंक यादवची टी-20 विश्वचषक संघासाठी निवड होते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पण मयंक यादवने आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे यात शंका नाही. विशेषत: मयंक यादव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जोरदार चर्चेत राहिला.
मयंक यादवने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध 4 षटकात 14 धावा देत 3 बळी घेतले. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 28 धावांनी पराभव केला. तर, मयंक यादवच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये त्याने 6 च्या इकॉनॉमी आणि 9 च्या सरासरीने 6 फलंदाजांना आपले बळी बनवले आहे.