Thomas and Uber Cup 2024 : गतविजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने सोमवारी क गटातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 5-0 असा पराभव करून थॉमस आणि उबेर करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. याआधी टीम इंडियाने पहिल्या सामन्यात थायलंडचा 4-1 असा पराभव केला होता.
Recap of #TeamIndia‘s dominant win 🚀🔝#ThomasUberCupFinals#ThomasCup#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/rjXTGJGdhE
— BAI Media (@BAI_Media) April 29, 2024
इंग्लंडविरुद्ध भारताची सुरुवात चांगली झाली होती. एचएच प्रणॉयने हॅरी हुआंगचा 21-15, 21-15 असा पराभव करत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर दुहेरीच्या लढतीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने बेन लेन आणि सीन वेंडी यांचा 21-17, 19-21, 21-15 असा पराभव केला.
यानंतर माजी जागतिक नंबर वन खेळाडू किदाम्बी श्रीकांतने नदीम दलवीचा 21-16, 21-11 असा पराभव करत भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताचा दुसरा दुहेरी संघ एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनी रोरी ईस्टन आणि ॲलेक्स ग्रीन यांचा 21-17, 21-19 असा पराभव करत संघाला मजबूत स्थितीत आणले. शेवटच्या सामन्यात किरण जॉर्जने चोलान कायानचा 21-18,21-12 असा पराभव करत भारतला 5-0 असा मोठा विजय मिळवून दिला.
Thomas and Uber Cup 2024 : भारतीय महिला संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक…
आता, शेवटच्या गट सामन्यात भारताचा पुढील सामना हा बुधवारी 14 वेळचा चॅम्पियन इंडोनेशियाशी होणार आहे. टीम इंडियाने गेल्या वर्षीही चमकदार कामगिरी करत अनेक मोठ्या संघांना पराभूत केले होते. तत्पूर्वी, भारतीय महिला संघाने उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.