IPL 2024 ( Live Cricket Score, KKR vs DC) : आज आयपीएल 2024 चा 47 वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीने 20 षटकात 9 गडी गमावून 153 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता विजयासाठी कोलकाता संघाला 154 धावांचे माफक आव्हान मिळालं आहे.
Innings Break!
Complete bowling performance from #KKR restrict #DC to 153/9
Kuldeep Yadav with a crucial 35*(26) in the end 👌
Will it be enough or will the hosts get back to winning ways? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/eTZRkma6UM#TATAIPL | #KKRvDC pic.twitter.com/7nypHzq3S6
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2024
दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांचा फ्लॉप शो….
प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ 7 चेंडूत 13 धावा करून माघारी परतला. 7 चेंडूत 12 धावा करून जॅक फ्रेजर मिचेल स्टार्कचा बळी ठरला. त्याचवेळी अभिषेक पोरेल 15 चेंडूत 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याशिवाय शाई होप (06), अक्षर पटेल(15), ट्रिस्टन स्टब्स (04) आणि कुमार कुशाग्र (01) हे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने 27 धावा केल्या, पण त्याला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही.
परिस्थिती अशी होती की 99 धावांपर्यंत दिल्ली कॅपिटल्सचे 6 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र, फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर कुलदीप यादवने जबाबदारी स्वीकारली. कुलदीप यादवने 26 चेंडूत 35 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने 150 धावांचा टप्पा पार केला. एकेकाळी ऋषभ पंतचा संघ दीडशे धावांचा आकडा गाठू शकणार नाही असे वाटत होते.
केकेआरच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी…
कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 16 धावा देत सर्वाधिक 3 फलंदाजांना आपले बळी बनवले. तर वैभव अरोरा (4 षटकात 29 धावा) आणि हर्षित राणा (4 षटकात 28 धावा) यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. याशिवाय मिचेल स्टार्क (3 षटकात 43 धावा) आणि सुनील नरेन (4 षटकात 24 धावा) यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.