Sreenivasa Prasad| कर्नाटकातील भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही श्रीनिवास प्रसाद यांचे सोमवारी 76 व्या वर्षी निधन झाले. श्रीनिवास प्रसाद यांच्यावर बंगळुरु येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्ही श्रीनिवास प्रसाद यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. प्रसाद यांनी चामराजनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून सहा वेळा नेतृत्व केले आहे. तर म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुडचे ते दोन वेळा आमदार राहिलेले आहेत.
व्ही श्रीनिवास प्रसाद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, “ज्येष्ठ नेते आणि चामराजनगरचे खासदार श्री व्ही. श्रीनिवास प्रसाद जी यांच्या निधनाने मला अतीव दुःख झाले आहे. ते सामाजिक न्याय व्यवस्थेत निपुण होते, गरीब, दलित आणि उपेक्षितांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले होते. विविध स्तरातील समाज सेवेसाठी ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या प्रती मी शोक व्यक्त करतो. ओम शांती,” असे मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे.
I am extremely pained by the passing away of senior leader and MP from Chamarajanagar, Shri V. Sreenivasa Prasad Ji. He was a champion of social justice, having devoted his life to the welfare of the poor, downtrodden and marginalised. He was very popular for his various works of…
— Narendra Modi (@narendramodi) April 29, 2024
तर मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी ‘अन्याय आणि विषमतेच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या या नेत्याचे जाणे हा राज्यातील सामाजिक न्यायासाठीच्या राजकीय लढ्याला मोठा धक्का आहे,’ असे म्हंटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री व्ही श्रीनिवास प्रसाद यांची राजकीय किरकीर्द
या वर्षी १८ मार्च रोजी प्रसाद यांनी सार्वजनिक जीवनातील ५० वर्षे पूर्ण करत निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. जेडीएस, जेडीयु आणि कॉंग्रेस मध्येही त्यांनी काम केले होते. प्रसाद यांनी १९९९ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर ते कर्नाटकातील कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. पण २०१६ मध्ये त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा :
“पाच वर्षात पाच पंतप्रधान….” ; सोलापुरातून नरेंद्र मोदी यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल