Nitin Gadkari | Lok Sabha Election 2024 – भाजपाचे नागपूर लोकसभेतील उमेदवार नितीन गडकरी यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी माझा विजय 101 टक्के निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर गडकरींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यंदा नागपूरच्या लढतीकडे राज्याचे विशेष लक्ष आहे.
दरम्यान, आपल्या विजयाची खात्री व्यक्त करताना गडकरी म्हणाले, ”यंदा 100 टक्के नाही तर 101 टक्के मीच विजयी होणार आहे. पाच लाखांच्या फरकाने मी विजयी होणार आहे, असेही ध्येय समोर ठेवले आहे. । Nitin Gadkari | Lok Sabha Election 2024
त्यासाठी आम्ही आमचे लक्ष्य पूर्ण केले आणि तसे कामही केले आहे. माझा विजय हा ऐतिहासिक विजय असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताला मजबूत सरकार देण्यासाठी हा लोकशाहीचा उत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे, असेही यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
सध्या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये संथ गतीने मतदान सुरू असून मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे” असे गडकरी म्हणाले. तसेच, देशात लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा मोठा सण साजरा करण्यात येत आहे.
मतदान करणे हा आपल्या सर्वांचा हक्क तर आहेच, पण ती आपली जबाबदारी देखील आहे. त्यामुळे सर्वांनी आपला हा हक्क बजावणे गरजेचे आहे. तुम्ही मतदान कोणालाही करा, पण मतदानाचा हक्क बजावावा, असे गडकरी म्हणाले. । Nitin Gadkari