मुंबई – वडाळ्यात ३१ वर्षीय युवकाचा कोयत्याने सपासप वार करुन खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हा खून जुन्या वादातून झाला आहे. वसंत कुमार देवेंद्र वय ३१ असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
खून झाल्याची माहिती वडाळा पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाचा पंचनामा करुन मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल केला. मात्र हत्येनंतर मारेकरी फरार झाले आहेत. वडाळा पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, वसंत कुमार देवेंद्र या तरुणाचा काही दिवसांपूर्वी त्याच्या परिसरात राहणाऱ्या इतर तरूणांशी वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून 30 मे रोजी रात्री साडेदहा वाजता वसंतकुमार याच्याजवळ दोन तरुण येऊन त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली होती. यानंतर वादाचं रुपांतर मारामारीत झाले. त्यानंतर दोघा तरुणांनी त्यांच्याकडे असलेल्या कोयत्याने वसंतकुमार याच्या अंगावर वार केला. यामध्ये वसंतकुमारचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच येथील स्थानिकांनी तातडीने वसंतकुमारयास रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
हे ही वाचा
— नागपुरात चार दिवसांपूर्वी झाला होता बाप-लेकाचा बुडून मृत्यू; घटनेचा व्हिडीओ आला समोर
— थरकाप उडवणारा व्हिडीओ ! चेकपोस्टवरील अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
— दादर रेल्वेस्टेशनवरील थरार CCTVत कैद! महिला आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली,…