JDU leader Saurabh Kumar। बिहारमधील जनता दल युनायटेडचे युवा नेते सौरभ यांची पाटणामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. लग्न समारंभ आटोपून परतत असताना रात्री उशिरा सौरभची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संतप्त लोकांनी पाटणा-गया रस्ता रोखून धरला. मारेकऱ्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप यश आलं नाही.
इंग्रजी वृत्तवाहिनीवृत्तानुसार, “बिहारमधील जेडीयूच्या तरुण नेत्याची बुधवारी रात्री पाटणा येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. रात्री उशिरा सौरभ कुमार आपल्या मित्र आणि कुटुंबासह लग्न समारंभातून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले JDU leader Saurabh Kumar।
एसपी भरत सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लग्न समारंभातून परत येताच मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी सौरभ कुमार यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी व्यक्तीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. .” जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोक्यात आणि मानेवर लागली गोळ्या JDU leader Saurabh Kumar।
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जीवघेण्या हल्ल्यात जेडीयू नेते सौरभ कुमार यांच्या डोक्यात आणि मानेवर गोळ्या लागल्या आहेत. गोळी लागल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. एसपी भारत सोनी म्हणाले की, ते राजकारण आणि व्यावसायिक संबंधांसह सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
सौरभ कुमार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर जनता दल युनायटेडचे संतप्त समर्थक घटनास्थळी जमा झाले. हत्येप्रकरणी प्रशासनाकडून कठोर आणि त्वरित कारवाईची मागणी जेडीयू कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांनी लवकरात लवकर मारेकऱ्यांना अटक करून हे प्रकरण उघडकीस आणावे, असेही सांगण्यात आलंय.