मुंबई – दादर रेल्वे स्थानकावर गंभीर गुन्ह्यातील एक महिला आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली. त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने धाडस दाखवत या महिलेचा जीव वाचवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर स्थानकातील फलाट क्रमांक चारवरुन पोलीस गंभीर गुन्ह्यातील महिला आरोपीला घेऊन जात होते. त्यावेळी महिला आरोपीने समोरुन येणारी लोक गाडी पाहून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा हात झटकून या महिलेने प्लॅटफॉर्मवरुन उडी मारली. पण अचानक उडी मारल्यामुळे ती तोल जाऊन खाली पडली.
त्यावेळीच समोरून लोकल ट्रेन येत होती. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी कमालीचं शौर्य दाखवत आणि सावधगिरी बाळगत ट्रेन येण्यापूर्वीच तिला ट्रॅकवरून बाजूला केले. स्टेशनवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे.
https://www.facebook.com/watch/?v=986042215478416
हे ही वाचा :
▸▸ थरकाप उडवणारा व्हिडीओ ! चेकपोस्टवरील अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
▸▸ डॉक्टर दांम्पत्याचा दिवसाढवळ्या गोळ्याघालून खून, घटनेचा थरार सीसीटिव्हीत कैद (Video)
▸▸ मुंबईत आमदाराच्या पत्नीचा ब्रीजवर चढून आत्महत्येचा प्रयत्न
▸▸ क्षणात झालं होत्याचं नव्हतं..! विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीच करोनामुळे निधन