चंदीगढ – भारताचे महान धावपटू ‘मिल्खा सिंग’ यांना काही दिवसांपूर्वी करोना विषाणूची लागण झाली होती. दरम्यान, शनिवारी मिल्खा सिंग यांनी करोनावर यशस्वी मात केली असून आता त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पण अजूनही ते ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. कुटुंबीयांच्या विनंतीनंतर मिल्खा सिंग यांना हॉस्टिपलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थीर आहे. परंतु त्यांच्या पत्नीला आय.सी.यू मध्ये दाखल करण्यात आले आहे. असं हॉस्पिटलनं सांगितले.
मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत पाच सुवर्णपदक जिंकली आहेत. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. फ्लाइंग शिख म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांचे वय आज रोजी 91 वर्षे आहे.
2013 मध्ये प्रदर्शित झालेला ‘भाग मिल्खा भाग’ हा हिंदी चित्रपट मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. शिवाय मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.