नागपूर – वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या बाप -लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना नागपुरातील झिल्पी तलावात घडली. वडील अब्दुल शेख (35 ) आणि मुलगा शबील शेख (12) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर आई आसमा थोडक्यात बचावली. टिपू सुल्तान चौकात राहणारे शेख दाम्पत्य आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी झिल्पी तलावावर गेले होते. यावेळी वडील आणि मुलगा तलावात उतरले तर आई ही पाण्यात उतरण्याच्या तयारीत असताना वडील आणि मुलगा दोघे बुडू लागले. मुलाच्या आईने आरडा ओरडा करत पाण्यात धाव घेत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र दोघांना वाचवण्यात यश आले नाही. यावेळी येथे उभ्या असलेल्या एका मुलाने हा व्हिडीओ केल्याचे समजते.
नागपुरात चार दिवसांपूर्वी झाला होता बाप-लेकाचा बुडून मृत्यू; घटनेचा व्हिडीओ आला समोर….. pic.twitter.com/KfOsHP1bmh
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 21, 2021
व्हिडिओमध्ये सुरुवातील दोघे बुडत असताना दिसत आहे. यानंतर मोबाइल खाली ठेवल्याची शक्यता आहे. दरम्यान त्या वेळेही ओरडण्याचा आवाज येत आहे. व्हिडिओच्या शेवटी मुलाच्या रडण्याचा आवाज येत आहे.
त्यावेळी नेमक काय झालं हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. आधी मुलाचे वडील तलावात पोहत होते. दरम्यान ते बुडू लागले. यानंतर घाबरलेल्या पत्नीने तलावात उडी घेतली व त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आई-वडिलांना तलावात पाहून मुलानेही पाण्यात उडी घेतली. या दुर्देवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.