मुंबई – ‘बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यानो परत फिरा रे….अशी आर्त हाक घालायची….. पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे..राजसाहेब ठाकरे.’ असं म्हणत मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेवर जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले होते की,’अनेक बंडखोर आमदार सांगतायत ती आमचं ठाकरे कुटुंबाप्रती प्रेम कायम आहे. जर त्यांचं प्रेम कायम असेल त्यांनी शिवसेनेत परतावं. त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी.’ त्यांचा या आव्हानावर ट्विट करत शालिनी ठाकरे यांनी टीका केली आहे.
काय आहे शालिनी ठाकरे यांचे ट्विट
बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यानो परत फिरा रे….अशी आर्त हाक घालायची…..
पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे..राजसाहेब ठाकरे …..!!!!#गद्दार #आदित्यठाकरे #शिवतीर्थ #याचिमण्यांनो— Shalini Thackeray (@ThakareShalini) July 11, 2022