सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या प्रचाराचा धुमधडाका चालू केला असून त्यांनी सातारा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे यांच्या मातोश्री या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
सातारा शहरातील जुने आणि निष्ठावंत शिवसैनिक असलेले बाळासाहेब शिंदे यांचा सातारा शहरात दांडगा लोकसंग्रह आहे आणि आघाडी धर्मानुसार बाळासाहेबांच्या सर्व मित्र परिवार व त्यांना मानणारे अनेक मतदार याचा फायदा निश्चित आघाडीचे उमेदवार श्री शशिकांतजी शिंदे साहेब यांना होणार आहे त्यामुळे त्यांच्या या भेटीमुळे सातारा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी बाळासाहेब शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शशिकांत शिंदे साहेब यांनी मोलाच्या सूचना केल्या व गाफील न राहता सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार करण्यास सांगितले.
यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख गणेश अहिवळे, शिवाजीराव इंगवले, विभागप्रमुख सुमित नाईक, सुनील भोसले, संतोष निगडकर, युवासेना उपजिल्हाधिकारी सागर धोत्रे, युवासेना शहर अधिकारी शिवेंद्र ताटे, राजू नाईक, अशितोष पारंगे, विनायक शिंदे, शहर संघटक प्रणव सावंत, अनिल शिंदे, कुमार पोतदार, विशाल भोसले, शांताराम भणगे, मनोज निंबाळकर, नीलेश शिंदे व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक व पेठेतील नागरिक उपस्थित होते.