नवी दिल्ली – लोकसभेची निवडणूकीतील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे.
असे असतानाच काँग्रेसला ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेडा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राधिका खेरा यांनी ट्विटरवर म्हटले की, आज मी अत्यंत दुःखाने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आणि माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. होय, मी एक मुलगी आहे आणि मी लढू शकते. मी आता तेच करत आहे. मी माझ्या आणि माझ्या देशवासीयांच्या न्यायासाठी लढत राहील, असे राधिका खेरा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.