काठमांडू – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या ३ दिवसांच्या नेपाळ दौऱ्याची आज सांगता झाली. या दौऱ्यामध्ये त्यांनी नेपाळच्या सरन्यायाधीशांशी दोन्ही देशांच्या न्यायव्यवस्थेमधील सहकार्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा केली.
नेपाळचे सरन्यायाधीश बिशोंभर प्रसाद श्रेष्ठ यांच्या निमंत्रणावरून न्या. चंद्रचूड शुक्रवारी काठमांडूत दाखल झाले होते. न्या. चंद्रचूड यांनी शनिवारी काठमांडू येथील एका परिसंवादात महत्त्वाचे भाषणही दिले.
बाल न्यायविषयक राष्ट्रीय परिसंवादात चंद्रचूड म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या जलद उत्क्रांतीमध्ये, अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या वाढत्या आंतरराष्ट्रीय डिजिटल गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवून आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करून
बाल न्याय प्रणालींनी जुळवून घेतले पाहिजे, असे मत त्यांनी या भाषणादरम्यान मांडले. त्यांनी मुलांमधील गुंतागुंतीच्या नातेसंबंधांबद्दल आणि ते इनुभवत असलेल्या जटिल सामाजिक प्रणालींबद्दल देखील मत मांडले.