पिंपरी (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने शारीरिक दृष्ट्या अपंग (दिव्यांग) असलेले मतदार व ज्यांचे वय 85 वर्षे पेक्षा जास्त मतदार आहे. अशा मतदारांसाठी गृहमतदान प्रक्रिया रावबिण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार बुथस्तरीय अधिकारी यांचे मार्फत घरोघरी सर्व्हेक्षण करून इच्छुक मतदाराकडुन 12 ड अर्ज भरण्यात आलेले आहेत.
या अर्जाची छाननी करून 34 पैकी 5 दिव्यांगासह पात्र मतदारांसाठी टपाली मतपत्रिका तयार करणेत आलेल्या आहेत. यासाठी गृहमतदान प्रक्रिया करणेसाठी मतदारांचे प्रत्यक्ष घरी जाऊन टपाली मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणेकामी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या पथकामध्ये सेक्टर ऑफीसर, पर्यवेक्षक, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, सुक्ष्म निरिक्षक, बीएलओ,व्हिडीयोग्राफर, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या पथकात नियुक्त अधिकारी,कर्मचारी यांनी दिनांक 7 मे 8 मे सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत होणार आहे याबाबतची पुर्व कल्पना संबधीत मतदार यांना लेखी स्वरूपात दिलेली आहे.
भारत निवडणूक आयोग यांचेकडील मार्गदर्शक सूचनाप्रमाणे गोपनियतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेऊन मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे. गृहमतदान प्रक्रियेसाठी मनोहर जावरानी यांची नोडल ऑफीसर म्हणुन नेमणुक केली आहे.