लोणंद, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेत लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील १४ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुक काळात रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून दखलपात्र अथवा अदखलपात्र गुन्हे घडण्याची शक्यता
गृहीत धरुन सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी दि. ५ मेच्या मध्यरात्रीपासून ते ७ मेच्या मध्यरात्रीपर्यंत लोणंद पोलीस ठाण्याच्या कार्याक्षेत्रात प्रवेश करण्यास माणिक दत्तात्रय शेळके, शुभम दीपक नरुटे, दीपक बबन नरुटे, निलेश विठठल रुपनवर, उमेश विठठल रुपनवर, विनोद नामदेव रुपनवर, शुभम शरद कोकरे,
बाळु दिनकर नरुटे, मच्छिंद्र एकनाथ जाधव, अमोल कांतीलाल शेळके, संतोष कांतीलाल शेळके, विराज नामदेव धुमाळ, नामदेव गणपत धुमाळ, तुषार ऊर्फ टिलु नामदेव धुमाळ (सर्व रा. मिरेवाडी, ता. फलटण) अशा एकूण १४ जणांना मनाई करण्यात आली आहे. मात्र त्यांचा मतदानाचा हक्क आबाधित राखुन त्यांना मतदानादिवशी दुपारी 1 ते 4 पर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदानासाठी शिथिलता देण्यात आली आहे.