अशी बनवा महाराष्ट्रीयन खुशखुशीत “कोथिंबीर वडी’

साहित्य – 1 बाउल बेसनपीठ, 1 बाउल पाणी, 2 बाउल कोथिंबीर, 2 टेबल स्पून तांदूळ पीठ, मसाले – ओवा, धना पावडर, हळद, हिंग गरम मसाला प्रत्येकी अर्धा टीस्पून, लाल तिखट, मीठ 1 टीस्पून, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट चवी प्रमाणे

कृती –
प्रथम एका बाऊल मध्ये डाळीचे पीठ घेऊन पाणी सर्व आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणे. नंतर कढई मध्ये फोडणी करून त्यात हिरवी मिरची पेस्ट घालून परतून घ्यावे. त्या मध्ये पीठ घालून शिजवून घ्यावे, त्या मध्ये 2 बाउल कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे, ताटाला तेलाचा हात लावून वड्या थापाव्या, थंड झाल्यावर कापून तळून घ्याव्यात.

– उषा कर्डिले, ओतूर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.