राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे?, असा सवाल केला होता. अमोल कोल्हे हे राजीनामा द्यायला निघाले होते. त्यांना मीच थांबवलं होतं, असा दावाही अजित पवार यांनी केला होता. यावर आता शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे.
अमोल कोल्हे गावभेट दौऱ्यानिमित्त खेड तालुक्यातील काळूस गावात आले होते. यावेळी त्यांनी अजितदादांवर निशाणा साधला. ते म्हणाले,’ ज्याला नटसम्राट म्हणवता, त्यानेच इतिहासाला उजाळा दिला..! मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटीसम्राट, खोकेसम्राट असलेलं चांगलं, असा खडा सवाल अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
ते पुढे म्हणाले,’अजित पवार फार मोठे नेते आहे. मी फक्त एवढचं म्हणेल, मी जे काही केलं ते स्वकर्तृत्वाने केलं. माझे काका नटसम्राट नव्हते. अजित पवार जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतला परफॉर्मन्स बघावा. मग त्यांना कळेल त्यांच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझा परफॉर्मन्स नक्कीच उजवा आहे, असं ते म्हणाले आहे.
पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील लढत ?
शिवाजी आढळराव पाटील यांनी 2004 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. 20 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं. त्यानंतर आता पुन्हा शिवसेना पक्षातून त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
डॉ. अमोल कोल्हे यांच्याविषयी बोलायचे झाले तर, त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना 2019 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली. त्यात त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे.
हे वाचाल का ? ‘शाहू महाराजांविरुद्ध 2 लाख 70 हजारापेक्षा जास्त लीडने जिंकणार’ संजय मंडलिकांना विश्वास