Sangli Lok Sabha। सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमधील पेच कायम राहिला असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीने सांगलीची जागा अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची घोषणा केली आहे. मात्र, अजूनही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सांगलीत आज पार पाडणाऱ्या मविआच्या मेळाव्यावर काँग्रेस बहिष्कार टाकणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उपस्थिती असणार आहे.
प्रमुख काँग्रेस नेते नागपूरला जाणार Sangli Lok Sabha।
ठाकरे गटाने जाहीर केलेले उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. मात्र मेळाव्याला न जाण्याची भूमिका काँग्रेसने घेतलीय. विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने मेळाव्याला जाणार नाहीत. सांगली जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते नागपूरला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी रमेश चेन्निथला, नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांना भेटीसाठी निरोप दिल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीचे नेते नागपुरला जाणार नाही
राष्ट्रवादी शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विश्वजीत कदम यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे . मात्र मेळाव्याला न जाण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने मेळाव्याला जाणार नाहीत.
सांगलीती घडामोडींना वेग Sangli Lok Sabha।
काँग्रेसमध्ये सांगलीच्या उमेदवारीवरुन अद्याप नाराजी कायम आहे. आज शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकासआघाडीचा मेळावा पार पडणार आहे. त्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रमुख नेते नेते नागपुरला भेटीसाठी जाणार आहे. आज नागपुरच्या बैठकीत सांगलीच्या जागेवर शेवटचा निर्णय होणार आहे. मात्र विशाल पाटील सांगलीत राहणार आहे. त्यामुळे सांगलीतील घडामोडींना वेग आला आहे.