#Live: मनसेच्या नव्या झेंड्याचे राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले.

मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को संकुलात हे अधिवेशन पार पडणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या अधिवेशनात मनसेचा झेंडा नव्या स्वरूपात सादर केला जाणार आहे. तसेच या अधिवेशनात राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • ठळक मुद्दे –
  • आजवर पक्षाने अनेक स्थित्यंतरं पाहिली, अनेक निर्भीड राजकीय भूमिका घेतल्या, तडफेने आंदोलनं केली.
  • जेट कर्मचाऱ्यांना न्याय देणारं आंदोलन, मराठी चित्रपटांना हक्काचं स्थान चित्रपटगृहांत मिळवून दिलं, आझाद मैदानावर धर्मांधांनी जेव्हा धुडगूस घातला तेव्हा बेधडकपणे आपण मोर्च्याने त्याला उत्तर दिलं होतं.
  • कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आपले सण निडरपणे साजरे झाले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच.
  • २५-२५ वर्ष सत्ता असूनही जे इतर शहरांमध्ये झालं नाही ते आपण नाशिकमध्ये संधी मिळाल्यानंतर केलं. बोटॅनिकल गार्डन, पाणीपुरवठा योजना, ५१० किमीचे रस्ते, संग्रहालय ही विकासकामं पाहिलीत तर तुम्हाला कळेल कि नवनिर्माण म्हणजे काय?
  • आमचे जे जे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांनी उत्कृष्ट कामं केली. उदाहरण द्यायचं झालं तर नेते बाळा नांदगावकर ह्यांचं देता येईल. सर्वाधिक प्रश्न विचारून पाठपुरावा करणारा आमदार म्हणून सलग ४ वर्ष अनेक संस्थांनी त्यांची पाठ थोपटली.
  • महाराष्ट्रात येणारे लोंढे थोपविण्यासाठी महाराष्ट्राला विशेष दर्जा द्या. महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांना प्रामुख्याने प्राधान्य दिलं गेलंच पाहिजे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.