Raj Thackeray | Narendra Modi | Lok Sabha Election 2024 – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहे. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही जनतेला संबोधित करणार आहे.
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीची मुंबईत सांगता सभा होणार आहे. यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत, त्यांचा मुंबईत रोड शो देखील होईल. राज्यात पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे.
या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी 17 मे रोजी मुंबईत भव्य सभा पार पडणार आहे. ही माहिती मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते वागीश सारस्वत यांनी अधिकृतपणे दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी 17 मे रोजी मुंबईत भव्य सभा पार पडणार आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रचाराच्या दृष्टिकोनातून ही सभा खूप खास असणार आहे.