राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीने चेतन तुपे यांच्या रूपाने एक स्वच्छ, अभ्यासू व कार्यबहुल प्रतिमा असलेला उमेदवार दिला आहे. त्यामुळे त्यांना कोंढवा भागातून सर्वाधिक मताधिक्य देऊ, असा शब्द कोंढवा भागातील सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे. तो शब्द पाळण्यासाठी सर्व स्तरातील कार्यकर्ते जोडीला घेऊन जीवाचे रान करण्याचा निर्धारही कोंढव्यात पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ कोंढवा भागातून काढण्यात आलेल्या पदयात्रेला मोठ्या प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी सरपंच भरतशेठ धर्मावत, नारायण लोणकर, राकेश कामठे, नगरसेवक गफूर पठाण, संदीप बधे, उदयसिंह मुळीक, दीपक कामठे, अजित लोणकर, शिवाजी मरळ, शामराव कामठे, बैजू वाघ, शरद धांडेकर, अनिस काझी, हसीना इनामदार, बैजू मरळ, सोमनाथ घोमन, समाधान धांडेकर, शाम मरळ, तेजस जगताप, नितेश जगताप, ओमकार कामठे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, रिपाइं जोगेंद्र कवडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. Let Chetan Tupen lead the vote in the fray