IPL 2024 (SRH vs LSG Match 57) : आयपीएल 2024 चा 57 वा सामना हैदराबादमध्ये आज (बुधवार, 8 मे) संध्याकाळी 7.30 पासून सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवला जाईल. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादचा शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला होता. तर, लखनौचा शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पराभव केला होता.
आयपीएल 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये फारसा फरक नाही. दोन्ही संघांनी 11 सामने खेळले असून 6 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. दोन्ही संघांचे समान 12 गुण आहेत. निव्वळ रनरेटमधील फरकामुळे लखनौचा संघ पाचव्या स्थानावर आहे.
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आतापर्यंत तीन सामने झाले असून लखनऊने तिन्ही सामने जिंकले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (१६), राजस्थान रॉयल्स (१६) आणि चेन्नई सुपर किंग्ज (१२) गुणतालिकेत अव्वल चार स्थानांसाठी सनरायझर्ससाठी कठोर स्पर्धा आहे. हा सामना जो जिंकेल तो गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर येईल.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघात प्रतिभेची कमतरता नाही. पण, संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. सनरायझर्सने गेल्या चारपैकी तीन सामने गमावले आहेत, मुख्यत: त्यांच्या पॉवर हिटर्स फलंदाजाच्या फ्लॉप शोमुळे. ट्रॅव्हिस हेड वगळता इतर फलंदाज चांगली कामगिरी करत नाहीत. आपल्या पॉवर हिटिंग क्षमतेचे प्रदर्शन केल्यानंतर, युवा सलामीवीर अभिषेक शर्माला गेल्या चार सामन्यांमध्ये फक्त एकदाच 30 धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. टी नटराजन सातत्याने चेंडूवर चांगली कामगिरी करत आहे, तर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही आपली लय शोधली आहे. भुवनेश्वरच्या गोलंदाजीमुळेच हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 1 धावांनी पराभव केला.
दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीतून सावरावे लागणार आहे. या सामन्यात लखनौचे गोलंदाज महागडे ठरले आणि लखनौविरुद्ध एकना स्टेडियमवर प्रथमच 200 धावांची मजल मारली आणि त्यांचा संघही 137 धावांत सर्वबाद झाला. या सामन्यात केएल राहुललाही संघाचा डाव पुढे नेण्यात अपयश आले आणि मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरनसारखे खेळाडूही अपयशी ठरले.
Saudi Smash 2024 : सौदी स्मॅश स्पर्धेत भारताच्या ‘मनिका बत्रा’ने केला मोठा उलटफेर…
मयंक यादव आयपीएलमधून बाहेर असल्याने आणि डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन यादव जखमी झाल्यामुळे, संपूर्ण जबाबदारी अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि यश ठाकूर यांच्या खांद्यावर आली आहे. याशिवाय मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या आणि रवी बिश्नोई यांनाही आपली ताकद दाखवावी लागणार आहे.