Shekhar Suman Net Worth| देशभरात सध्या लोकसभा निवडणुका पार पडत आहेत. आतापर्यंत तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. काल 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीच्या मतदानाच्या दिवशी बॉलीवूड अभिनेता शेखर सुमन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याने चित्रपटांसह अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हिरामंडी’मध्ये त्याने नवाबाची भूमिका साकारली आहे. यातील त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यानंतर आता शेखर सुमन यांनी पंधरा वर्षानंतर परत त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले शेखर सुमन हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. शेखर सुमन यांचे मुंबईमध्ये अत्यंत आलिशान घर आहे. शेखर सुमन यांच्याकडे 20 कोटी संपत्ती आहे. मर्सिडीज बेंज आणि बीएमडब्ल्यू सारख्या गाड्या देखील शेखर सुमन यांच्याकडे आहेत. Shekhar Suman Net Worth|
‘हिरामंडी’मुळे चर्चेत
शेखर सुमन यांच्या टीव्हीवरील ‘देख भाई देख’ मधील त्याच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. ‘लाफ्टर चॅलेंज’मध्ये जज होण्यापासून ते ‘मूव्हर्स अँड शेकर्स’ सारख्या चॅट शोचे होस्टिंग करण्यापर्यंत त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली. आता ‘हिरामंडी’मुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. शेखर सुमनने ‘हिरामंडी’मध्ये नवाब झुल्फिकारची भूमिका साकारली आहे. या मालिकेत मल्लिकाजनची भूमिका साकारणाऱ्या मनीषा कोईरालासोबत त्याने इंटिमेट सीन दिले होते, ज्याची बरीच चर्चा रंगली. Shekhar Suman Net Worth|
शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात शेखर सुमन यांनी लढवली होती निवडणूक
यापूर्वी शेखर सुमन यांनी 2009 मध्ये कॉँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी शेखर सुमन यांनी पटना साहिबमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. शेखर सुमन यांनी भाजप उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणूकीमध्ये शेखर सुमन यांचा पराभव झाला. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा हे विजयी ठरले होते. आता शेखर सुमन यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा: