mallikarjun kharge voting । आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. देशातील ९३ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यात आज दिग्गज नेत्यांचे भविष्य पणाला लागणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी कलबुर्गी येथे मतदान केलं. कलबुर्गी येथे काँग्रेसचे राधाकृष्णा आणि भाजपचे उमेश जाधव यांच्यात लढत आहे. दरम्यान, मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेसचा प्रचंड बहुमताने विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
#WATCH | Karnataka: Congress national president Mallikarjun Kharge casts his vote at a polling station in Kalaburagi.
Congress has fielded party chief Mallikarjun Kharge’s son-in-law Radhakrishna Doddamani from Kalaburagi constituency and BJP has fielded Umesh G Jadhav.… pic.twitter.com/ynfFT0bspi
— ANI (@ANI) May 7, 2024
काँग्रेस प्रचंड बहुमताने विजयी होईल mallikarjun kharge voting ।
यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, सर्व मिळून काँग्रेसला विजयी करू. या निवडणुकीत काँग्रेस प्रचंड बहुमताने विजयी होत आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी संध्याकाळीच मतदानाची आकडेवारी द्यावी. यावेळी निवडणुकीत महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा असून, या मुद्द्यावरच लोक मतदान करत आहेत.” असे त्यांनी म्हटले.
हे वाचलं का ?
देशात 9 वाजेपर्यंत कुठे आणि किती झाले ‘मतदान’ ?
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
तिसऱ्या टप्प्यात मोदींच्या 10 मंत्र्यांचे ‘भवितव्य’ ठरणार; वाचा यादी
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात