Sunita Williams| भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी पुन्हा अंतराळात जाण्यासाठी तयारी केली होती. सुनीता विल्यम्स यांच्यासह बूच विल्मर या मोहिमेत सहभागी होणार होत्या परंतु ही मोहीम आता रद्द झाली आहे. प्रक्षेपकातील तांत्रिक बिघाडामुळे ही अंतराळ मोहीम सोमवारी रात्री स्थगित करावी लागली.
सुनीता विल्यम्स या बुच विल्मोर यांच्यासह अंतराळ मोहिमेसाठी बोइंग स्टारलाइनरने अंतराळात झेपावणार होत्या. मात्र लाँचिंगच्या काही तास आधी तांत्रिक बिघाड झाला. ज्यामुळे ही मोहीम रद्द करण्यात आली आहे. आता ही मोहीम पुन्हा कधी राबवली जाईल याबाबत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तांत्रिक समस्या दूर झाल्यास ‘स्टारलायनर’ अंतराळयान शुक्रवारपर्यंत अवकाशात झेपावू शकेल, असे ‘बोइंग’ने सांगितले आहे. Sunita Williams|
भारतीय वेळेनुसार, मंगळवारी सकाळी ८.०४ वाजता फ्लोरिडातील केप कॅनाव्हरलच्या स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स-४१ वरून अॅलटस व्ही प्रक्षेपकांवर स्टारलाइनर अंतराळयान प्रक्षेपित केले जाणार होते. या यानातून सुनिता विल्यम्स आणि विल्मोर अंतराळात झेपावणार होते. मात्र ऍटलस व्ही रॉकेटचे प्रक्षेपण लिफ्ट-ऑफच्या अवघ्या ९० मिनिटांपूर्वी रद्द करण्यात आले.Sunita Williams|
यापूर्वीही विविध स्वरूपाच्या तांत्रिक बिघाडांमुळे ही मोहीम लांबली आहे. याशिवाय, बोइंग स्टारलायनरच्या मानवरहित अंतराळ मोहिमेस २०१९मध्ये अपयश आले होते. याआधी जुलै २०२२मध्ये स्टारलाइनर या नव्या यानातून अंतराळवीर अवकाशात जाणार होते, मात्र करोनामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती.
सुनीता विल्यम्स यांची माहिती
सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९६५ मध्ये झाला. १९८७ यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतलेल्या सुनीता विल्यम्स यांनी लढाऊ विमानेही उडवली आहेत. १९८८ मध्ये नासाने सुनीता विल्यम्स यांची अंतराळवीर म्हणून निवड केली. त्यांनी एक्सपिडिशन ३२ चे फ्लाइट इंजिनीअर आणि एक्सपिडिशन ३३ चे कमांडर म्हणून काम केले आहे. त्यांचे वडील दीपक पांड्या या अहमदाबादमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते.
सुनीता विल्यम्स यांना ३० प्रकारच्या लढाऊ विमानांवर तीन हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणांचा अनुभव आहे. याआधी सुनीता विल्यम्स २००६ आणि २०१२ या वर्षांमध्ये अंतराळ मोहिमेवर गेल्या होत्या. विल्यम्स या ३३२ दिवस अंतराळात राहिल्या आहेत.
हेही वाचा:
आलिशान बंगला, महागड्या कार…; भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शेखर सुमन यांची करोडोंची मालमत्ता