पहिल्याच दिवशी ‘लेट मार्क’

वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना कर्मचाऱ्यांची तारांबळ

पुणे – लॉकडाऊन 5 मध्ये सोमवारपासून शहरातील कार्यालये, दुकाने आदी सुरू करण्याला परवानगी दिली आहे. यामुळे नोकरदार, व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांनी वाहने घेऊन बाहेर पडण्यास सुरुवात केली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांतील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. परिणामी, नोकरदारांना “लेट मार्क’ला सामोरे जावे लागले. टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, डेक्‍कन, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, स्वारगेट चौक, विद्यापीठ रस्ता आदी रस्त्यांसह विविध ठिकाणी वाहनांची गर्दी होती.

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता सुरू…
लॉकडाऊनमध्ये बंद असणारा छत्रपती शिवाजी महाराज रस्ता सोमवारी दुपारनंतर वाहतुकीसाठी खुला केला. मागील अनेक दिवसांपासून या भागांतील करोना रुग्णांची संख्या वाढल्याने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बंद ठेवला होता. अद्यापही प्रतिबंधित क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेडींग कायम आहे. या रस्त्यावरील वाहतूक बाजीराव रस्त्याने वळवली होती. दुहेरी वाहतूक असल्याने अपघाताचा धोका वाढला होता.

वाहनांच्या रांगा
संचेती हॉस्पिटल जवळील पुलाजवळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये जंगली महाराज रस्त्याकडे जाणारी आणि विद्यापीठ रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा समावेश होता. कात्रजकडून स्वारगेट ये-जा करणाऱ्या आणि टिळक रस्त्यावर भर दुपारी दुतर्फा वाहनांच्या रांगा होत्या. बालगंधर्व येथील रस्त्यावरदेखील वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.