IPL 2024 ( Live Cricket Score : KKR vs PBKS ) :- आज आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 261 धावा केल्या आहेत. त्यामुळे पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 262 धावांचे लक्ष्य आहे. कोलकाता नाईट रायडर्सची स्फोटक सुरुवात झाली. सलामीवीर फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी पहिल्या विकेटसाठी 10.2 षटकांत 138 धावा जोडल्या. फिल सॉल्ट 37 चेंडूत 75 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार मारले.
Time to switch modes from batting to bowling 🕹️ pic.twitter.com/Sl4M0WbCRr
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 26, 2024
सुनील नरेन आणि फिल सॉल्ट यांची स्फोटक सुरूवात…
सुनील नरेनने 32 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी केली. या फलंदाजाने आपल्या झंझावाती खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. मात्र, आंद्रे रसेल 12 चेंडूत 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पण व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांनी सहज षटकार आणि चौकार मारले. व्यंकटेश अय्यरने 23 चेंडूत 39 धावा केल्या. तर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने 10 चेंडूत 28 धावाची खेळी केली.
कोलकाता नाईट रायडर्सला 138 धावांच्या स्कोअरवर पहिला धक्का बसला. यानंतर दुसरा फलंदाज 163 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. तर आंद्रे रसेल तिसरा फलंदाज म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सची धावसंख्या 203 धावा होती. यानंतर रिंकू सिंग 4 चेंडूत 5 धावा करून माघारी परतला. तर रमणदीप सिंग याने 3 चेंडूत 6 धावांचे योगदान दिले.
पंजाब किंग्जच्या गोलंदाजांची अवस्था…
पंजाब किंग्जच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, अर्शदीप सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. अर्शदीप सिंगने 4 षटकात 45 धावा देत 2 बळी घेतले. पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करन चांगलाच महागात पडला. कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी सॅम करनच्या 4 षटकांत 60 धावा केल्या. सॅम करनला केवळ 1 यश मिळाले. याशिवाय राहुल चहर आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.