पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुणे स्टेशन, अरोरा टॉवर कॅम्प, विश्रांतवाडी व दांडेकर पुल या परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील बदल करण्यात आला आहे. रविवार, दिनांक १४ एप्रिल रोजी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. (Pune: Changes in traffic in Pune city on the occasion of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)
जयंती निमीत्त समाजातील सर्व स्तरातील नागरीक पुणे शहर व बाहेर गावाहून मोठ्या प्रमाणात मिरवणूकीने व निरनिराळे वाहनातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील पुतळा, अरोरा टॉवर चौकातील पुतळा आणि विश्रांतवाडी चौक ते कळस फाटा व कळसफाटा ते विश्रांतवाडी चौक परिसरात येत असतात.
या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचे दोन्ही बाजूस गर्दी होत असते. त्यामुळे त्या ठिकाणांवर वाहन चालकांची गौसोय होऊ नये व वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालने करिता आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे बदल करण्यात येणार आहे.
१. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर
* शाहिर अमर शेख चौक शाहिर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहिर अमर शेख चौकातून वळविण्यात येणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग शाहिर अमर चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक जहांगीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
* जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळविण्यात येणार आहे. जीपीओ चौकातून बोल्हाई/मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक नेहरू मेमोरियल चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
* पुणे स्टेशन चौक पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पुणे स्टेशन चौकातून वळविण्यात येणार आहे. येथे येणारी वाहने पुणे स्टेशन अलंकार चौक मार्गे इच्छितस्थळी जातील
* नरपतगिरी चौक नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चौकातून वळविण्यात येणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग १५ ऑगस्ट चौक कमला नेहरु हॉस्पीटल, पवळे चौक, कुंभारवेस चौक मार्गे असा आहे .
* बॅनर्जी चौक : बॅनर्जी चौकाकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक बॅनर्जी चौकातून वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग बॅनर्जी चौकाकडून पॉवर हाऊस चौक, नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु हॉस्पीटल, पवळे चौक, कुंभारवेस चौकातून वाहने इच्छितस्थळी जातील.
* ससुन हॉस्पीटल येथील अत्यावश्यक रुग्णांसाठी ससून हॉस्पीटल येथील डेड हाऊस शेजारील गेटने प्रवेश देण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थेतील बदल हे दिनांक १४ एप्रिल राजी सकाळी सहा पासून गर्दी संपेपर्यंत तात्पुरते स्वरुपात असतील
पार्किंग व्यवस्थेबाबत
* मालधक्का चौक ते बोल्हाई चौक ते पुणे स्टेशन, बोल्हाई चौक ते साधु वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जी.पी.ओ., बोल्हाई चौक ते नरपतगीर चौक, फोटोझिंको प्रेस उपरस्ता व बोल्हाई चौक ते डॉ. बॅनर्जी चौक या रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेखेरीज सर्व प्रकारची वाहनांना नो-पार्किंग करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करावयास येणा-या भाविकांच्या वाहनांकरीता आर.टी.ओ. शेजारी एस.एस.पी.एम.एस. मैदान (दुचाकी व चारचाकी वाहने). पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी व चारचाकी वाहने), व ससून कॉलनी येथे (दुचाकी वाहने) अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
२. अरोरा टॉवर परिसर
* डॉ. कोयाजी रोड तीन तोफा चौक डॉ. कोयाजी रोड वरुन (सिल्व्हर जुबली मोटर्स) नेहरु चौकाकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग : डॉ. कोयाजी रोड तीन तोफा चौक एस.बी.आय. हाऊस चौक मार्गे इच्छितस्थळी
* ईस्कॉन मंदिर चौक ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक ईस्कॉन मंदिर चौकातून वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग डॉ. कोयाजी रोड तीन तोफा चौक एस.बी.आय. हाऊस चौक मार्गे इच्छितस्थळी
* नेहरु चौक नेहरु चौकाकडुन तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतुक नेहरु चौकातून वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग:- नेहरु चौकातून किराड चौक ब्ल्यु नाईल चौक एस.बी.आय. हाऊस मार्गे इच्छितस्थळी
* नाझ चौक – महात्मा गांधी रोडवरुन नाझ चौकातून अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक नाझ चौकातून वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग नाझ चौक डावीकडे वळून बाटलीवाला बगीचा मार्गे इच्छितस्थळी
पार्किंग व्यवस्थेबाबत
* दोराबजी चौक ते अरोरा टॉवर ते तीन तोफा चौक व अरोरा टॉवर ते नाझ चौक, तारापोर रोड जंक्शन या रस्त्यांवर सर्व प्रकारचे वाहनांकरीता नो पार्किंग करण्यात येत आहे. अरोरा टॉवर चौकातील डॉ. आंबेडकर यांचे पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणा-या भाविकांनी आपली वाहने तारापोर रोड, ईस्ट स्ट्रीट व अन्य रस्त्यांवरील पे-अॅण्ड पार्कच्या ठिकाणी पार्क करावीत.
सिंहगड रोड जंक्शन (दांडेकर पूल) परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत
१. स्वारगेट कडुन सिंहगड रोडला जाणारी वाहतुक : सावरकर चौक ते थोरले बाजीराव पेशवे पथ (सणस मैदान पथ कॉर्नर) ते कल्पना हॉटेल चौक ते ना.सी. फडके ते मांगीरबाबा चौक ते सेनादत्त पोलीस चौकी चौक ते बालशिवाजी ते आशा हॉटेल चौकातून सिंहगड रोडकडे जाईल
२. सिंहगड रोड कडुन स्वारगेट कडे जाणारी वाहतुक :आशा हॉटेल चौकातून डावीकडे वळुन ते बालशिवाजी ते सेना दत्त पोलीस चौकी चौक ते मांगीरबाबा चौक ते ना.सी. फडके चौक ते कल्पना हॉटेल चौक ते सणस पुतळा चौक सोयीनुसार जाता येईल
३. शास्त्रीरोड कडुन येणारी वाहतूक :सेनादत्त चौकाकडुन येणारे वाहने डावीकडे मांगीर बाबाचौकाकडुन ना. सी. फडके चौकाकडे पुढे जातील
हे आदेश वाहतूक उपायुक्त (प्रभारी) रोहिदास पवार यांनी काढले आहेत.